ताज्याघडामोडी

दिव्यांग कल्याण निधीसाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ दिव्यांग भावाचाही मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी दिव्यांंगांच्या विकासासाठी खर्च करण्याचे कायदेशीर बंधन असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात स्मशानभूमीत सुरू असलेल्या चक्री उपोषणात कुटुंबीयांसह सहभागी झालेल्या एका दहा वर्षाच्या दिव्यांग मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी याच प्रश्नावर झालेल्या आंदोलनादरम्यान त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. परंतु प्रशासनाला दिव्यांग विकास निधीचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. त्यातूनच चाललेला आंदोलनात बहिणीपाठोपाठ भावाचाही मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रकार उजेड आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृत मुलावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका चिखर्डेकरांनी घेतली आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम व बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने हे चिखर्डे गावात दाखल होऊन आंदोलक गावक-यांशी संवाद साधत आहेत. परंतु सायंकाळपर्यंत या आंदोलनाची कोंडी कायम होती. संभव रामचंद्र कुरूळे असे मृत दिव्यांग मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रशासन हादरले आहे.

चिखर्डे गावात राहणारे रामचंद्र कुरूळे यांची दोन्ही मुले दिव्यांग होती. ग्रामपंचायतीकडून दिव्यांग कल्याण निधीसाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठी कुरूळे कुटुंबीयांसह काही गावकरी मंडळींनी १५ आॕगस्टपासून ग्रामपंचायतीसमोर चक्री उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने हे आंदोलन बेदखल केले असतानाच पुढे थोड्याच दिवसांत रामचंद्र कुरूळे यांची दिव्यांग मुलगी वैष्णवी (वय १३) हिचा आंदोलनस्थळीच मृत्यू झाला होता.त्यावेळी प्रशासन जागे होऊन दिव्यांग कल्याण निधी उपलब्ध होण्यासाठी बैठका घेतल्या. परंतु कायदेशीर अडचणींमुळे मूळ प्रश्न तसाच प्रलंबित राहिला होता.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर कुरूळे कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठविला होता. परंतु मृत वैष्णवीच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी झाली नव्हती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अपघाती मृत्यू प्रकरणात आर्थिक मदत मिळू शकते, कुरूळे कुटुंबीयांसाठी ही तांत्रिक अडचण ठरली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago