उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील मंगलौरमध्ये एक अजब घटना घडली आहे. मुलीचं लग्न १० दिवसांवर आलं असताना तिची आई प्रियकरासोबत पळून गेली. मुलीच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेले दागिने घेऊन आई पसार झाली. कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मंगलौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३८ वर्षीय महिला रमा (नाव बदलण्यात आलंय) तिचा प्रियकर राहुलसोबत (नाव बदलण्यात आलंय) पळून गेली. घरातील लाखो रुपयांचे दागिने घेऊन तिनं पळ काढला. महिला आणि तिचा प्रियकर एकाच कंपनीत काम करायचे. महिलेच्या पतीचं निधन वर्षभरापूर्वी झालं आहे. तिला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचा विवाह १४ डिसेंबरला आहे. त्यामुळे घरात लगीनघाई सुरू होती. पाहुण्यांची ये-जा सुरू होती.
घरातलं पहिलंच शुभकार्य असल्यानं अनेकांना निमंत्रणं पाठवण्यात आली. अनेकांच्या घरी पत्रिका पोहोचल्या. शनिवारी रात्री रमा अचानक बेपत्ता झाली. कुटुंबियांनी राहुलवर संशय आला. त्यांनी त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तो फरार असल्याचं समजलं. महिलेच्या कुटुंबियांनी घरात शोधाशोध केली. तर लाखो रुपये आणि दागिने गायब असल्याचं समजलं. यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
महिला आणि तरुण शनिवारी रात्री फरार झाल्याचं मंगलौर पोलीस ठाण्याचे एसएचओ राजीव रौथान यांनी सांगितलं. महिलेच्या मुलीचा विवाह १४ डिसेंबरला होता. तिच्या लग्नासाठीचे दागिने घेऊन महिला पसार झाल्याची माहिती रौथान यांनी दिली. महिला आणि तरुण एकाच कारखान्यात काम करायचे. दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं. दोघांनी पळून लग्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. दोघांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असं रौथान म्हणाले.
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…