ताज्याघडामोडी

पत्नीच्या प्रियकराची दृश्यम स्टाईल हत्या; निर्घृणपणे संपवून पुरलं, पण एका चुकीमुळे सापडला

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. २६ वर्षीय श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. आफताबविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आफताबनं हत्येआधी दृश्यम चित्रपट पाहिला होता. तशी माहिती त्यानं पॉलिग्राफनं टेस्टमध्ये दिली. अशीच काहीशी घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली.

दृश्यम चित्रपट पाहून एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. गौतम गोहेल गुजरातच्या तारघडीमध्ये वास्तव्यास होता. तो मजुरी करायचा. त्याच्याच गावात असलेल्या मेंढपाळाच्या पत्नीसोबत त्याचं सूत जुळलं. दोघे पळून गेले. मात्र नंतर दोघे परतले. याबद्दल मेंढपाळाला समजलं. त्यानं गौतमला संपवण्यासाठी कट रचला.

मेंढपाळ आणि अन्य काही जणांनी गौतमला गवरिदल गावात भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह आपल्याच अंगणात पुरला. पोलिसांनी कॉल तपशील तपासून त्याच्या आधारे केवळ १४ दिवसांत प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी तरुणाला फोन करणारी तरुणी आणि दोन्ही मारेकऱ्यांना अटक करून चौकशी केली.

पोलीस आरोपीला मृतदेह पुरलेल्या ठिकाणी घेऊन गेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृत तरुण गौतमचे वडील जयंतीभाई गोहेल यांनी या प्रकरणात शैलेश उर्फ कालो लक्ष्मण जपदा, त्याचा भाऊ सागर लक्ष्मण जपदाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. मुलगा गौतम १४ नोव्हेंबरला रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाल्याचं जयंतीभाई यांनी तक्रारीत म्हटलं होतं. यानंतर पीएसआय एम. एच. यादव यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago