औरंगाबाद शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) युवक शहराध्यक्षाने एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केला. लग्नाचे तसेच घर देण्याचे अमिष दाखवून त्याने पीडित महिलेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. यातून पीडिता गरोदर राहिली. तिने लग्नासाठी तगादा लावला असता, आरोपीने तिच्या पोटात लाथ मारून तिचा गर्भपात केला.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.जयकिशन कांबळे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच, वरिष्ठांनी कांबळे याची पक्षातून पाच वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी जयकिशन कांबळे याने पीडित महिलेला तिच्या पतीपासून विभक्त केले. त्यानंतर तिला लग्नाचे तसेच घर देण्याचे अमिष दाखवले. इतकंच नाही तर तुझ्या मुलांना सांभाळेल, तुझ्या सोबत लग्न करेल, असे आमिष दाखवून शहरातील राजनगर परिसरात रूम घेऊन पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केले.यातून पीडित महिला गरोदर राहिली. त्यानंतर महिलेने आरोपी जयकिशन याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. सुरूवातीला त्याने टाळाटाळ केली. पीडितेने अधिकच तगादा लावला असता, आरोपीने तिच्या पोटात वारंवार लाथा मारून तिचा गर्भपात केला. इतकंच नाही तर, याबाबत तू जर कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांना ठेवणार नाही, अशी धमकी सुद्धा दिली.
या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी जयकिशन कांबळे याला तात्काळ अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच, पक्षाने सुद्धा त्याची पाच वर्षासाठी हकालपट्टी केली आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…