राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत.
कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तर, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटीचा कार्यभार देखील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपवून कार्यमुक्त होण्याचे आदेश काढले आहेत. कार्यमुक्त होऊन पुढील आदेशाची वाट पाहा, असं राज्य सरकारनं काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या धडक कामाची काही अधिकाऱ्यांनी राज्याच्या एका मंत्र्याकडे तक्रार केल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त करण्याच्या हालचाली झाल्याच्या चर्चा आहेत.
तुकाराम मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. या दौऱ्यांच्या काळात जे अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे वागतील त्यांना मुंढे यांनी त्यांच्या खास शैलीत इशारा दिला होता. तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक भूमिकेमुळं काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यातूनच काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी केल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात तुकाराम मुंढे यांना सूचना देखील केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…