पेहे ता.पंढरपूर येथील कृतिशील शिक्षकाचा गौरव
खरा शिक्षक दिन हा 05 सप्टेंबर नसून शिक्षणासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली अशा महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन हा खरा शिक्षक दिन आहे, अशी मांडणी काही पुरोगामी संघटनांकडून सातत्याने होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह, व रयत प्रकाशन यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण संपन्न झाले..
पेहे तालुका पंढरपूर येथील कृतिशील शिक्षक प्राचार्य मारुती गायकवाड यांना आज ‘गुणवंत शिक्षक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला..
प्राचार्य मारुती गायकवाड यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचं आयोजकांनी सांगितलं.. प्रा.गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून कृतिशील शिक्षक म्हणून काम करत आहेत, त्यासोबत ते महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत, त्यासोबत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेहे येथे ते प्राचार्य पदावर कार्यरत असून नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंध्या बाळे येथे त्यांची संचालक पदी निवड झाली आहे..
या मिळालेल्या पुरस्कारामुळे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर व इतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे..
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…