अजितदादा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा उपक्रम
पंढरपूर – अजितदादा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पंढरपूर यांच्यावतीने देशाचे नेते पद्मविभुषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श माता व कर्तृत्ववान महिलांचा मातोश्री शारदाई पुरस्कार देवून दि.1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूर येथील बॅरिस्टर पी.जी.पाटील सभागृहात सन्मान करण्यात येणार आहे. सदरच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण व ऍड.रूपालीताई ठोंबरे-पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर युवा समाज प्रबोधनकार वसंत हंकारे सर यांचे मुलांनो आई वडिलांना ही समजून घ्या हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व अजितदादा फाऊंडेशनचे संस्थापक श्रीकांत शिंदे यांनी दिली.
या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील रंजना आवटे (लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या मातोश्री), सुवर्णालता रामदास भाजीभाकरे (जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे व पोलीस उपायुक्त संदिप भाजीभाकरे यांच्या मातोश्री), कमल गाढवे (मारूती गाढवे यांच्या मातोश्री), विद्या क्षीरसागर (मयुरा शिंदेकर असिस्टंट डायरेक्टर स्मार्ट सिटी यांच्या मातोश्री), श्रीमती लोकमुद्रा सुरेश पाटील (उमेश पाटील यांच्या मातोश्री), श्रीमती गोपाबाई साबळे (पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांच्या मातोश्री), मिनाक्षी सुभाष कदम (सुजीत कदम यांच्या मातोश्री), सुनंदा खांडेकर (जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्या मातोश्री), लक्ष्मी राठोड (पीएसआय विजय राठोड यांच्या मातोश्री), यमुना काळेल (महाराष्ट्र केसरी चंद्रहार निमगिरे यांच्या आत्या), पद्मीनी राऊत (लेखक अनिल राऊत यांच्या मातोश्री) यांच्यासह किर्ती नंदकिशोर भरडिया (वरळी सी लिंक ते गेट ऑफ इंडिया हे समुद्री 38 कि.मी.अंतर 7 तास 22 मि.पुर्ण करून विश्वविक्रम केल्याबद्दल), किरण नवगीरे (ता.माळशिरस आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळविल्याबद्दल), सिनेट सदस्य प्रा.डॉ.सुशिलकुमार शिंदे, बजरंग शितोळे, डॉ.समाधान माने, डॉ.आर्यन कांबळे (बी.ओ.एस.), ऍड.उषा पवार, डॉ.अमर कांबळे (आय.क्यू.एसी) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमेशदादा पाटील, कल्याणराव काळे, सुभाषदादा भोसले, विश्वराज महाडिक, भगिरथ भालके, युवराज पाटील, दिलीप धोत्रे, कविता म्हात्रे, संतोषभाऊ नेहतराव, नलिनी चंदेले, विजय देशमुख, प्रियदर्शिनी महाडिक, प्रेमलता रोंगे, रमेश बारसकर, जयमालाताई गायकवाड, गणेशदादा पवार, प्रा.खिलारे सर, महमंद उस्ताद, सुधीरआबा भोसले, संदिप मांडवे, साधना राऊत, राजश्री ताड, सुनिता माने, अनिता पवार, चारूशिला कुलकर्णी, श्रेया भोसले, स्वप्निल जगताप, सुरज पेंडाल आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी दादा थिटे, तानाजी मोरे, संतोष बंडगर, सुरज कांबळे, आकाश नेहतराव, सुरज पावले आदि परिश्रम घेत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…