ताज्याघडामोडी

तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत मातोश्री सरूबाई माने विद्यालय प्रथम

तालुकास्तरीय आंतरशालेय १७ वर्ष वयोगटातील संघाची बाजी 

पंढरपूर तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा लोटस पब्लिक स्कूल कासेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या. सदर स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील शालेय क्रिडा स्पर्धांत कायमच उल्लेखनीय प्रदर्शन करणार्या मातोश्री सौ.सरुबाई माने विद्यालय व कला शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भटुंबरे तसेच मातोश्री गुरुकुल भटुंबरे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १७ वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी गटातून पंढरपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला. या विजया बद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.वामनराव माने सर, संस्थेचे सचिव प्रा.सुभाषराव माने सर, प्राचार्य उत्तमराव कोकरे, संस्थेचे संचालक विक्रमसिंह माने सर यांनी अभिनंदन करुन जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या..
क्रिडा शिक्षक सर्वश्री सुभाष हेगडे सर, सुरज लोंढे सर,अंकुश कारंडे सर,अजयनाना खांडेकर सर यांनी मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले. या वेळी नाना मदने सर,प्रा.अमरसिंह खांडेकर,प्रा.राजुरी सर,प्रा.नवनाथ देवकते व सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago