चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पुलावरील स्लॅब कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
त्यापैकी आठ जणांची प्रकृीत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्याने काही प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच प्रवासी हे 60 फूट उंचीवरुन थेट रेल्वे रुळावर कोसळले आहेत. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काजीपेट पुणे एक्सप्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी हे पहिल्या क्रमांच्या प्लॅटफॉर्मवरुन चौथ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जात होते. या दरम्यान प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने पुलाचा भाग कोसळला. विशेष म्हणजे संबंधित दुर्घटना घडली तेव्हा पुलावर तब्बल 80 जण होते.
पुलाचा स्लॅब खाली कोसळला. गर्दी जास्त असल्याने संबंधित घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमी प्रवाशांना तातडीने बाजूला करण्यात आलं. त्यांना लगेच रुग्णालयात पाठवण्यात आलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…