तालूक्यातील सुरेगाव रास्ते येथे एक दुर्देवी घटना घडली आहे.शेतातील विहिरी जवळ असलेले मधाचे मोहोळ काढण्यासाठी गेलेला १२ वर्षीय बालक ऋषीकेश गजानन चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेला. विहीरीजवळील मधाचे मोहोळ काढण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याचवेळी मधमाशा त्याच्यामागे लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्याचवेळी विहिरीच्या कठड्यावरुन त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो विहिरीत पडला.
या दुर्घटनेत ऋषीकेशचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ४ पर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. तो विहिरीत पडल्याच लक्षात आले. त्यानंतर विहिरीतून पाणी उपसल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…