ताज्याघडामोडी

धाकट्या बहिणीची निधनवार्ता समजली; पाणी भरणारी थोरली बहिण जागीच कोसळली

धाकट्या बहिणीच्या निधनाची वार्ता कानावर पडताच गावातच राहणाऱ्या थोरल्या बहिणीनेही नळावर पाणी भरत असतानाच प्राण सोडले. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे काल शुक्रवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे. या सख्ख्या बहिणींची एकत्रच अंतयात्रा काढून गावकऱ्यांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.

चंद्रभागा गंगाराम पैठणकर (६५) व गुंफाबाई हरी वाघ (६०) दोघी सख्ख्या बहिणी भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे आपापल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी पहाटे नेहमीप्रमाणे गुंफाबाई दूध घेऊन घरी आल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबियांनी त्यांना लगेच भोकरदन येथे व त्यानंतर सिल्लोडला उपचारासाठी हलविले. पण त्यांना वाचवण्यात अपयश आले. हृदयविकाराने गुंफाबाई यांचा मृत्यू झाला.

गावात घडलेल्या या घटनेची खबर त्यांची मोठी बहीण चंद्रभागाबाई यांच्या कानावर पडली. ही दुःखद घटना त्यांना कळली तेव्हा त्या गावातील नळावर पाणी भरत होत्या. बहिणीचे दुःखद निधनाची बातमी कळताच त्यांना जोरदार धक्का बसला. शोकमग्न स्थितीत पाणी भरत असतानाच त्यांच्या हातातील हंडा खाली पडला आणि त्या जागेवरच कोसळल्या. कोसळताच त्यांचाही जागेवरच मृत्यू झाला.

दोन्ही बहिणींच्या निधनाची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. नातेवाइकांनी दोघींचे मृतदेह घरी आणले. दुपारी दोन्ही बहिणींची गावातून एकत्रच अंत्ययात्रा काढण्यात आली. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग पाहून गावातील बाया-बापड्यांना अश्रू अनावर झाले. या बहिणींवर एकाच वेळी वेगवेगळ्या चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सख्ख्या बहिणींच्या आकस्मिक निधनाने पैठणकर व वाघ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रभागाबाई पैठणकर यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली तर गुंफाबाई वाघ यांच्या पश्चात पती, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

4 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago