भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात एका वडापाव विक्रेत्यावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील आता समोर आला आहे.
कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करत भररस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये दुचाकी वाहनांवरून चार ते पाच हल्लेखोर अचानक येऊन वडापाव विक्रेत्यावर कोयता आणि इतर धारधार हत्यारांनी हल्ला करताना दिसून येत आहे. त्यासोबतच हल्लेखोरांनी वडापावच्या गाडीवरील साहित्यदेखील रस्त्यावर फेकून दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
हल्ला होताच वडापावच्या गाडीजवळील नागरिक भयभीत झाले. त्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान हल्लेखोर त्याठिकाणी उपस्थित अजून एका व्यक्तीवरही हल्ला करताना या सीसीटीव्हीत व्हिडिओत दिसत आहेत. या घटनेनंतर हल्लेखोर दुचाकींवर बसून त्या ठिकाणाहून पळ काढतात. या घटनेने परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…