अमळनेर येथील गटविकास अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कामासाठी नाशिकला जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये जळगावच्या अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले आहेत. आज बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्यावर काळाने घाला घातला.
धरणगाव गावाजवळील भोणे फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात चौधरी यांच्या कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. गटविकास अधिकारी प्रवास करत असलेल्या भरधाव वाहनाने उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की, यात शासकीय वाहनाचा समोरील भाग पूर्ण चक्काचूर झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. अमळनेर-धुळे या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी एमएच १९ डीव्ही ४१९९ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले असलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. तर, गटविकास अधिकार्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचार्यांनी देखील अपघातस्थळ गाठले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…