विवाहबाह्य संबंधातून नागपुरात एक वेगळीच घटना घडली आहे. आपल्यासोबत पळून जाण्यास नकार दिल्यानं एका विवाहित प्रियकरानं प्रेयसीच्या वडिलांच्या मालकीचा मिनी ट्रक आणि भाजीचं दुकान पेटवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी आणि महिलेचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. याबद्दल समजताच आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली. प्रेयसीनं आपल्यासोबत वाघोदा गावात यावं, त्यासाठी घर सोडावं यासाठी आरोपीनं तगादा लावला होता. मात्र तिनं पळून येण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकरानं प्रेयसीच्या वडिलांचं दुकान आणि मिनी ट्रक पेटवून दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
लग्नानंतर आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्याने पत्नीने अबोला धरला. जिच्याशी प्रेमसंबंध होते, तिने देखील दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. या रागातून विवाहित तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीत घडला आहे. महिलेचा गळा चिरुन त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर खून केल्यानंतर याने प्रेयसीचा मृतदेह एका झुडपात फेकून दिला होता. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलिसांच्या शाखा तीनच्या पथकाने गुन्हेगाराला अटक केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…