माहेरातून पाच लाखांची रक्कम घेऊन येत नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मुस्लीम नवविवाहितेचे डोक्यावरील संपूर्ण केस कापून विद्रूप केले आणि नंतर तलाक, तलाक, तलाक असे तोंडी संबोधून नांदविण्यास नकार देत तिला माहेरी सोडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला.
याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात पोलिसांनी मुस्लीम महिला संरक्षण कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सुमैय्या कलीम चौधरी (वय २०) असे दुर्दैवी पीडित नवविवाहितेचे नाव आहे. तिच्या फिर्यादीनुसार पती कलीम सत्तार चौधरी, सासू रजिया सत्तार चौधरी आणि सासरे सत्तार चौधरी (रा. फैजुलबारी मशिदीजवळ, राजेंद्र चौक, सोलापूर) यांच्या विरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित सुमैय्या हिचा विवाह १३ मे २०२२ रोजी झाला होता. सासरी नांदण्यास आल्यानंतर लगेचच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. माहेरातून पाच लाख रूपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी तगादा लावला. परंतु तिने एवढी रक्कम देण्याची माहेरची आर्थिक कुवत नसल्यामुळे मागणीची पूर्तता करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून पतीसह सासू-सासरे तिचा सातत्याने छळ करू लागले. तिला घरातील एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले जात होते.
तिच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात येऊ लागला. ती सतत परपुरूषाकडे पाहते म्हणून सासू व सासऱ्याच्या सांगण्यावरून पती कलीम याने ओळखीच्या नाभिकाला घरी बोलावले आणि सुमैय्या हिच्या डोक्यावरचे संपूर्ण केस कापून मुंडन केले. एवढ्यावरच न थांबता पती कलीम याने तिला पुन्हा मारहाण करून ‘ तलाक, तलाक, तलाक ‘असे तीनवेळा तोंडी उच्चारून तिला नांदविण्यास नकार दिला. एका कागदावर तिची बळजबरीने सही घेतली. नंतर तिला पुन्हा दहिटणे येथे माहेरी आणून सोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…