आखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद कोंडे – देशमुख यांच्यावर भादे गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने प्रदिप कोंडे-देशमुख यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. यावेळी प्रसाद कोंडे यांच्या सुरक्षारक्षकाने बचावासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने जीवित कोणाला दुखापत झाली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे .
नाथमंदीर व मोर्वे (ता.खंडाळा) येथील दत्तमंदीराचे दर्शन घेऊन मोर्वे- वाघोशी रस्त्यावरून लोणंदकडे आपल्या चारचाकी वाहनातुन (गाडी क्रमांक एमएच12, युजी 999) निघाले होते. मोर्वे-वाघोशी रस्त्यावरील खिंड उतरताना हा प्रकार घडला. वाहनांची वर्दळ नसणारा हा भाग नेहमी निर्मनुष्य असतो. हीच संधी साधून हल्लेखोरांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. कोंडे यांच्या गाडीच्या समोरुन दुचाकीवरून येणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी प्रसाद कोंडे यांच्या गाडीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, त्यापैकी एकही गोळी प्रसाद कोंडे यांना लागली नाही. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस निरिक्षक महेश इंगळे, लोणंदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…