अधिसंख्य पदामुळे सेवानिवृत्ती नंतरच्या लाभावरील अन्याय दूर करा
आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेकडून ना.सुरेश खाडेंना निवेदन
महाराष्ट्रातील विस्तारीत क्षेत्रातील कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर आणि टोकरे कोळी जमातीवर होत असलेल्या अन्याय दुर करण्यासाठी अनुसुचीत जमातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारल्यामुळे व महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार विशेष मागास प्रवर्गात स्थांनातरीत करण्यात आले असून त्यांना सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या जगदीश बहीरा निकालावरून सर्व कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर अकरा महिन्याची नेमणूक करणेत आलेली आहे. सदरचा निकाल – पुर्वलक्षी प्रभावाने सर्व कर्मचाऱ्यांना लागू होत नसताना त्यांच्यावर अन्याय करून त्यांना अधिसंख्य पदावर नेमणूक केलेली आहे. व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व सेवानिवृत्तीचे लाभ अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाहीत. हे चुकीच्या निर्णयामुळे आमचे समाजातील सर्व कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असून त्यांना योग्य न्याय मिळणेसाठी त्यांना पुढील कालावधीत अधिसंख्य पदावरील नेमणूक रद्द करून पुर्वीप्रमाणे त्यांची नेमणूक कायम स्वरूपी करावी. व सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ त्वरित देण्यात यावेत.
तसेच महाराष्ट्र राज्यातील विस्तारीत क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर आणि टोकरे क जमातीवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनाचे सुट आदेश नसल्याकारणाने महाराष्ट्र राज्यातील विस्तारीत क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर आणि टोकरे कोळी या जमातीना मा.सक्षम अधिकारीयांचे कडून अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र तसेच अनुसुचीत जमात नवरे साठ पडताळणी समिती पुणे याचेकडून अनुसुचीत जमातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारले जात आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वरील सर्व जमाती त्याच्या सांविधानिक आरक्षणापासून वंचीत आहेत. त्यांचे जीवन जगण्याचे मुलभूत अधिकार संबंधीत अधिकान्याकडून चुकीच्या कारणाने हिरावून घेतल्या गेल्या कारणाने महाराष्ट्र राज्यातील विस्तारीत क्षेत्रातील सर्व जमाती शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय असे सर्व बाजूने मागास राहिलेला आहे.
मा. राजेंद्र भारूड, आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व सर्व पडताळणी समित्यांचे अधिकारी यांचे समक्ष संयुक्त बैठक आयोजित करून आमचे म्हणणे काय आहे. व आमचेवर कशाप्रकारे अन्याय होत आहे. तो दुर करण्यासाठी आपण आम्हाला योग्य ते सहकार्य करून सदरची बैठक लवकरात लवकर लावावी समाजाचे गाडे अभ्यासक मा. प्रा. डॉ. शरण खानापूरे सर हे आमचे समाजावर कशाप्रकारे अन्याय झालेला आहे. याची सविस्तर माहिती खालील मान्यवरांना समोर योग्यप्रकारे सादर करणेची संधी देण्यात यावी अशी मागणी आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री नामदार सुरेश खाडे हे पंढरपूर येथे आले असता येथील शासकीय विश्रामगृहात निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी अशोक अधटराव अध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग महाराष्ट्र,भारत करकमकर समन्वयक महाराष्ट्र राज्य,संजय माने कार्यध्यक्ष आदिवासी कर्मचारी वर्ग सोलापूर जिल्हा,प्रकाश बुवा अभंगराव,सोमनाथ कोळी,सोमनाथ अभंगराव,रघुनाथ अधटराव,विश्राम कोताळकर,नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…