महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं.
आज गडकरी आणि पवारांचं मोठेपणा सांगताना राज्यपालांनी बोलण्याच्या नादात छत्रपती शिवरायांची तुलना थेट गडकरींशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ वा दीक्षांत समारंभा संपन्न झाला. याच कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
सोलापूर येथील सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक माऊली पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी असे वादग्रस्त विधान करायला नको होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने मांडली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…