ताज्याघडामोडी

स्वेरीचे विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार -व.पो.नि.अरुण फुगे

वारीतील उत्कृष्ट कार्याबद्धल स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

पंढरपूर- ‘शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील विधायक कार्यामुळे ‘स्वेरी’ या शिक्षण संस्थेचे नाव मी फार पूर्वीपासून ऐकून होतो पण पंढरपूर पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतल्यानंतर मात्र कार्तिकी वारीच्या निमित्ताने स्वेरीच्या कार्याला जवळून पाहता आले. स्वेरीच्या विद्यार्थ्यांची वारीतील कामगिरी ही फार मोलाची आहे. वारीच्या दर्शन रांगेतील वारकरी असो अथवा पंढरपूर शहरातील प्रत्येक महत्वाचा चौक असो, प्रत्येक ठिकाणी स्वेरीचे विद्यार्थी भक्तांना व गरजू नागरिकांना मदत करत होते. स्वेरीच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली सहकार्याची भावना प्रशंसनीय आहे. भाविकांना पाहून जी उदात्त भावना निर्माण होते तशीच भावना स्वेरीतील विद्यार्थ्यांना पाहून निर्माण होते. स्वेरी विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करते त्यामुळे स्वेरीच्या सहकार्यातून यंदाची वारी शिस्तबद्ध झाली. मी सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे परंतु पंढरपूर यात्रेत इन्चार्ज म्हणून हा माझा पहिलाच अनुभव होता. स्वेरीच्या मदतीने अगदी पोलिसांच्या निवासापासून ते विद्यार्थ्यांच्या मोलाच्या सहकार्यापर्यंत सर्व कार्ये उत्तम पार पडली. यामुळेच स्वेरीची महाराष्ट्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची अहोरात्र मदतीची भूमिका पाहून मनस्वी समाधान झाले. पोलीस प्रशासनाला देखील स्वेरीचे सातत्याने सहकार्य लाभते.’ असे प्रतिपादन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले.
कार्तिकी वारीमध्ये स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) विद्यार्थ्यांनी वारी काळात अत्यंत मोलाची भूमिका बजावल्याबद्धल पंढरपूर पोलीस स्टेशन तर्फे सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रे देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे हे स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव करत होते. प्रारंभी विद्यार्थी अधिष्ठाता व स्वेरी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती यांनी प्रास्ताविकातून स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वारीच्या काळात केलेले सहकार्य तसेच निर्मल वारी, श्रमदान, प्रबोधनात्मक कार्यक्रम, आरोग्याची काळजी, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन, वृक्षसंवर्धन, ग्राम स्वच्छतेचे महत्व, जनजागृती, पाणी व्यवस्थापन, शैक्षणिक प्रबोधन, शिक्षणाची गरज, लहान मुलांचे हक्क व सुरक्षितता तसेच संबंधित विविध विषयांवर प्रबोधनपर व ग्रामस्वच्छता विषयक कार्यक्रमांची माहिती दिली. वारी काळात दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्धल पोलीस खात्याकडून स्वेरीचे आभार मानण्यात आले तसेच स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांना सन्मानित करण्यात आले. विराज शेटे, सुरज बंगाळे, रितेश चव्हाण, कृष्णा इंगळे, प्रमोद आवळेकर, प्रेरणा कोळी, दिव्या लवटे, साक्षी पोरे, तन्वी पवार, सुप्रिया चौगुले, धनश्री बागल यांच्यासह जवळपास १२० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देवून सन्मानित करण्यात आले. निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत म्हणाले की, ‘मी चार्ज घेतल्यापासून छेडछाडीबद्धल अनेक महाविद्यालयाच्या तक्रारी आहेत परंतु स्वेरीच्या विद्यार्थ्यांविषयी अद्याप कोणतीही तक्रार नोंद नाही. त्यामुळे स्वेरीच्या शिस्तीचे अनुकरण इतर महाविद्यालयांनी करावे आणि विद्यार्थ्यांना कुठेही रोड रोमिओ अथवा गुंडाकडून त्रास अथवा छेडछाड झाली तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. त्याचा वेळीच बंदोबस्त केला जाईल.’ असे सांगून ‘केवळ शिस्तीमुळे पोलीस स्टेशनला स्वेरीचा अभिमान वाटतो’ असे प्रतिपादन केले. यावेळी पो.ना.प्रसाद आवटे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्यासह स्वेरीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. वैशाली मुचलंबे व प्रांजली उत्पात यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. यशपाल खेडकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago