कर्मयोगी मध्ये ‘आविष्कार’ मोठ्या उत्साहात संपन्न.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित केलेल्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे महाविद्यालय स्तरावरील आविष्कार या प्रकल्प स्पर्धेच्या च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी आपला उस्फूर्त सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांची विभाग स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विभाग स्तरावरील स्पर्धा देखील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथेच होणार आहेत अशी माहिती आविष्कार चे संयोजक प्रा. आशिष जोशी यांनी दिली. याप्रसंगी सह संयोजक प्रा.रणजीत भोसले, प्रा.विद्यासागर जगताप, प्रा. योगेश घोडके, प्रा. अमरजीत देवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक, प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ ए बी कणसे,रजिस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले व सर्व प्राध्यापक यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…