ताज्याघडामोडी

ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान; राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी बुधवारी केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील, असे मदान यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल, असेही मदान यांनी सांगितले.

जिल्हानिहाय संख्या

अहमदनगर : २०३, अकोला : २६६, अमरावती : २५७, औरंगाबाद : २१९, बीड : ७०४, भंडारा : ३६३, बुलडाणा : २७९, चंद्रपूर : ५९, धुळे : १२८, गडचिरोली : २७, गोंदिया : ३४८, हिंगोली : ६२, जळगाव : १४०, जालना : २६६, कोल्हापूर : ४७५, लातूर : ३५१, नागपूर : २३७, नंदुरबार : १२३, उस्मानाबाद : १६६, पालघर : ६३, परभणी : १२८, पुणे : २२१, रायगड : २४०, रत्नागिरी : २२२, सांगली : ४५२, सातारा : ३१९, सिंधुदुर्ग : ३२५, सोलापूर : १८९, ठाणे : ४२, वर्धा : ११३, वाशीम : २८७, यवतमाळ : १००, नांदेड : १८१ व नाशिक : १९६.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago