स्वेरीत करीअर मार्गदर्शन सत्र संपन्न
‘मोठमोठ्या यशाची सूत्रे ही वेगवेगळी असली तरी त्यात परिश्रम हाच गुण कायम असतो.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबत कौशल्ये व मूल्येही आवश्यक आहेत.’ असे प्रतिपादन करिअर गायडन्स चे एक्स्पर्ट जयगोपाल नायडू यांनी केले.
स्वेरीमध्ये ‘यु आर अ प्रॉडक्ट…हाऊ व्हॅल्यू ऍडिशन विल हेल्प यु सक्सीड इन युवर करिअर’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. या सत्रात जयगोपाल नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. दिपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात प्रमुख पाहुणे नायडू यांनी विद्यार्थ्यांना ‘ड्रीम बीग अँड बिलीव्ह इन युवर स्ट्रेन्थस, यु हॅव द पोटेन्शियल, फ्लाय हाय’ हा मेसेज दिला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून मार्गदर्शन करताना ‘टफ टाईम्स नेव्हर लास्ट बट टफ पीपल डू’ या पुस्तकाने माझ्या जीवनाला कलाटणी दिली आणि तेंव्हापासून मी नियमित वाचन करू लागलो. वाचनामुळे मन प्रसन्न राहते आणि मानसिक दृष्ट्या खंबीर राहिल्यास निर्णय अचूक ठरतात.‘ असे प्रतिपादन केले. पुढे मुख्य मार्गदर्शक जयगोपाल नायडू म्हणाले की, ‘पुर्वीच्या काळात उपलब्ध असणाऱ्या बाबी मर्यादित होत्या त्यामुळे त्यांची निवड करताना फारसा विचार करावा लागत नसे पण सध्याच्या आधुनिक जगामध्ये बहुतेक सर्व बाबी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थी हे देखील कंपन्यांच्या नजरेतून एक प्रॉडक्ट असतात. त्यामुळे कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करताना त्यांची गुणवत्ता आणि कौशल्यांना प्राधान्य देतात म्हणून विद्यार्थ्यांनी करिअर करण्यासाठी केवळ शिक्षणावरच अवलंबून न राहता इतरांपेक्षा वेगळी गुणवत्ता सिद्ध करणे व वेगळी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.‘ असे सांगून स्वेरीतील प्लेसमेंट विभागाचे कौतुक केले. सुब्बालक्ष्मी नायडू यांनी आपल्या भाषणातून ‘या धकाधकीच्या जीवनात मानवाचे स्वास्थ्य हरवून जात आहे. अशा परिस्थतीत प्रत्येकांनी प्राणायम करणे गरजेचे आहे. सतत आनंदी रहा कारण आपल्या भावना ह्या चारित्र्य स्पष्ट करतात.’ असे सांगून सादरीकरण करताना आचरण कसे असावे, देहबोली कशी असावी? हे सांगून त्यांनी उपस्थितांकडून प्राणायम करून घेतले. ‘कॉर्पोरेट जगात टिकून राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व’ या विषयावर अनुपमा नायडू यांनी ‘योगा आणि मेडीटेशन’ यांच्या माध्यमातून आनंदी कसे राहावे याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी अॅड.रेवती मुदलियार, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या डिप्लोमा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…