कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांना हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ४ लाख पॅकेजची नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
महाविद्यालयातील काजल दशरथ पवार आणि साक्षी राहूल उपलाप यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीत मुलाखत दिली होती. या मुलाखतीतून त्यांची निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ४ लाख पगाराची नोकरी मिळाली आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच पंढरपूर सिंहगड मधील अनेक विद्यार्थ्यांना जास्त पॅकेज देणाऱ्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अनेक आय. टी. कंपन्या येऊन विद्यार्थ्यांची मुलाखतीतून निवड करतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कंपनीत पंढरपूर सिंहगडचा विद्यार्थी स्वतःचा ठसा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व स्थापन करून आपले करिअर करीत आहेत. चालू शैक्षणिक वर्षांत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील ४३५ हून अधिक विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळाली. अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने विद्यार्थी व पालकांचा विश्वास संपादन करून यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे.
“हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…