ताज्याघडामोडी

स्वेरी अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाची प्लेसमेंट मध्ये भरारी

आय. टी. व प्रशासकीय क्षेत्रात देखील अनेक विद्यार्थी यशस्वी

 

मॅकेनिकल इंजिनिअरिंग या विभागाच्या विद्यार्थ्यांना तब्बल ३२१ हुन अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत’,  अशी माहिती संस्थेचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट कडे विशेष लक्ष दिले जाते. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या नेतृत्वाखाली व विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर व विभागातील  उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षात मिळालेल्या जॉब ऑफर्स याप्रमाणे आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडून ३२, कॅपजेमिनी कडून २५, इन्फोसीस कडून २०, विप्रो कडून २३, मॅग्ना कडून ०९, कॉग्नीझंट कडून ०७, बॉश कडून ०३, डीएक्ससी टेक्नॉलॉजी कडून ०४, इंटेलिपॅट कडून ०२ तर बायजू कडून ०२ जॉब ऑफर्स मिळालेल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या  कोअर कंपन्यांकडून एकूण ९५ जॉब ऑफर्स मिळालेल्या आहेत तर  ९९ जॉब ऑफर्स आय.टी. क्षेत्रातील नामांकित कंपन्याकडून मिळालेल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना देखील आय.टी. कंपन्यांमध्ये मिळालेल्या या प्लेसमेंटमुळे स्वेरीमध्ये  विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. स्वेरी अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग मधील आकाश अजगर, सचिन क्षीरसागर, श्रद्धा गजाकोश, सौरभ खडसरे, रोहित आदलिंगे, प्रणय डिसले, प्रणिल नागरस, युवराज शेलार व मानसी घोगले, मुस्कान आतार, आकाश वळसंगे आणि गणेश तोडकर यांना एकापेक्षा अधिक कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे प्रशासकीय क्षेत्रात देखील स्वेरी अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाचे  विद्यार्थी विशेष चमकले आहेत. त्यामध्ये संतोष माळी हे भारतीय महसूल सेवा,आयकर विभाग (युपीएससी -६१२ रँक), नागनाथ पाटील हे एपीआय अर्थात सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुहास ठोंबरे हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक,भालचंद्र यादव हे नायब तहसीलदार म्हणून मोहोळ मध्ये कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांचे गाव म्हणून राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या उपळाई (बुद्रुक) मधील श्रीकृष्ण नकाते हे परभणी मध्ये सहाय्यक आरटीओ, विवेक लोंढे हे सोलापूर मध्ये डेपो मॅनेजर, कौस्तुभ गव्हाणे हे मुख्याधिकारी, गणेश विघ्ने हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सुप्रिया घाडगे ह्या पुण्यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अर्जुन मेलगिरी हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अजिंक्य दुबल हे उस्मानाबाद मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आशिष जाधव हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अमित पाटील हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कुलदीप पवार हे उस्मानाबादमध्ये मोटार वाहन निरीक्षक, दत्तात्रय शिंदे हे पुण्यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अनिकेत वाघमारे हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आदिका खरात ह्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सोनिका घाडगे ह्या अकलूज मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, विशाल नाझीरकर हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सरकारी व प्रशासकीय क्षेत्रासोबतच आय.टी. क्षेत्रात देखील स्वेरी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आपला दबदबा निर्माण केलाय हे मात्र नक्की.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago