ताज्याघडामोडी

स्वेरीचे माजी विद्यार्थी विशाल भगरे यांची ‘असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर’ पदी निवड

सरकारी नोकऱ्यांमध्येही स्वेरीचा डंका

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी विशाल विष्णू भगरे यांची ‘असिस्टंट मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर’ पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पदासाठी महाराष्ट्र शासनाकडून सन २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात लागला असून  सदर परीक्षेत ते  महाराष्ट्रात बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये स्वेरी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या आतापर्यंत सुमारे २० तर सिव्हील इंजिनिअरिंग विभागाच्या सुमारे ६५ विद्यार्थ्यांची सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झालेली आहे.
विशाल भगरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वासूद अकोला येथे तर  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर, (ता. मोहोळ) येथे झाले. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात प्रवेश घेण्याचे अगोदरच निश्चित केलेले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वेरीतच प्रवेश मिळविला. शिक्षणासाठी तब्बल चार वर्षे  स्वेरीच्या वसतिगृहात राहून अभ्यास सुरू केला. पदवीच्या चारही वर्षांमध्ये त्यांनी विद्यापीठाच्या  गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात त्यांचा विद्यापीठात पाचवा क्रमांक आला होता. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाद्वारे त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश कसे मिळवायचे आणि त्यासाठी कसे परिश्रम करायचे याची माहिती घेवून अभ्यास सुरु केला. अभियांत्रिकीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. त्यांचे वडील शिक्षक असून आई गृहिणी आहेत. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी रोंगे व  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व  प्राध्यापकांचे  बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्वेरीमध्ये ‘गेट’ चे उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी उत्तम गुण मिळवून गेट परीक्षेत देखील यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल  स्वेरीच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीचे  कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, प्रा. बी. डी. गायकवाड व  प्रा. एस.आर. गवळी हे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना विशाल भगरे  म्हणाले की, ‘स्वेरीत असणारे वैयक्तिक मार्गदर्शन, एकूण शिक्षण संस्कृती, गेट या  परीक्षेबाबतचे ट्रेनिंग  आणि अभ्यासपुरक वातावरण यामुळे मला यशस्वी होता आले. माझ्या या यशात स्वेरी परिवाराचा खूप मोठा वाटा आहे तसेच ‘पुढे जाऊन मी एमपीएससी आणि यूपीएससी साठीही प्रयत्न करणार आहे.’ संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी विशाल भगरे यांचे अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago