ताज्याघडामोडी

“कुणी सांगितलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं?”, शरद पवारांची तुफान फटकेबाजी

राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही.

माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती, तेव्हा तीन महिन्यांच्या आतमध्ये ७२ हजारो कोटींचे कर्ज माफ केलं होतं, असा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील शेतकरय़ांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तेव्हा एका शेतकऱ्याने शरद पवारांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवार म्हणाले, “जेजुरीच्या सहकऱ्यांनी सांगितलं, बाहेर फिरु नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं आणि एकच हशा पिकला.

“मी केंद्रीय मंत्री असताना देशात फळबाग योजना आणली. त्याअंतर्गत फळबाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं. कोकणात गेला तर, काजू आणि हापूसाचे हजारो एकर क्षेत्र आहे. एकेकाळी कोकणाचे लोक १६ वर्षे वय झालं की, मुंबईला कामासाठी जायचे. ६० वय झालं की गावाकडे माघारी यायचे. आज मुंबईला जायची भूमिका कोकणातील लोकांची नाही. फळबाग योजनेतून जास्तीत जास्त आंबा, काजू, फणस कसा लावता येईल, यासाठी प्रयत्न करतात,” असेही शरद पवारांनी नमूद केलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

10 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago