एस .के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात “स्पार्क २के२२” राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात १२ ऑक्टोबर रोजी “स्पार्क २के२२ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सौरभ शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, स्थापत्य अभियांत्रिक विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. चेतन पिसे व आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौरभ शंभरकर यांचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध महाविद्यालयातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये पोस्टर प्रेझेन्टेशन, कॅडवाॅर,
अँड्रॉइड गेमिंग, आणि क्विझ काॅम्प्युटिशन यासारख्या राज्यस्तरीय स्पर्धां घेण्यात आल्या. यामध्ये विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. रोहित गायकवाड सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्वेता जाधव व शुभांगी कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…