ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-२ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दिवाळीनंतर

२७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणार ही प्रक्रिया

‘शै. वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि. २७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया शनिवार, दि.२९ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या दुसऱ्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दि. ३१ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे.ज्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी प्रथम फेरीत नॉट फ्रीझ/ बेटरमेन्ट केली आहे त्यांना या दुसऱ्या फेरीचा लाभ घेता येईल.’ अशी माहीती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
       सन २०२२-२३ च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रियानंतर  पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण  झाली आहे. पहिल्या फेरीत योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी फेरी असून योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याबाबत चे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड- २ चे ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) दि ३१ ऑक्टोबर  रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. दुसऱ्या फेरीनंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष  महाविद्यालयात जाऊन मंगळवार दि.१ नोव्हेंबर ते गुरुवार दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागेल. प्रथम वर्ष पदवी  इंजिनिअरिंगच्या  प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या फेरीला देखील विक्रमी गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

21 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago