ताज्याघडामोडी

चिमुकल्याचा चौथा वाढदिवस ठरला भयंकर, गाडीत फुग्यांचा स्फोट, बर्थडे बॉयसह तिघे भाजले

चिमुकल्याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त ‘सुपरमॅन थीम’वर आयोजित केलेली बर्थडे पार्टी कुटुंबाच्या आनंदावर विरजण टाकणारी ठरली. कारण हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांचा कारमध्येच स्फोट झाल्याने आग भडकून कारमधील तिघांना भाजले. यामध्ये चार वर्षांच्या बर्थडे बॉयचाही समावेश आहे.

फुग्यांमध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हेलियम गॅसऐवजी अत्यंत ज्वलनशील असा हायड्रोजन वायू भरलेला होता. याबद्दल फुगे विक्रेत्याने कुटुंबाला कुठलीही चेतावनी दिली नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. चिमुकल्याच्या आईने (ओळख न सांगण्याच्या अटीवर) सांगितले की वाढदिवसाच्या पार्टीहून घरी जात असताना कारमधील बूट स्पेसमध्ये उर्वरित फुगे ठेवले असताना कारमध्ये लहानसा स्फोट झाला.

इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले असताना कारमधील फुगे फुटू लागले. त्यामुळे अचानक ज्वाला आणि धुराचा लोट उठला. यामध्ये महिलेच्या परिचयातील दोघे जण आणि मागच्या सीटवर बसलेल्या तिच्या मुलाला त्रास झाला आणि ते भाजले. तर महिला कार चालवत होती.

“फुग्यांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपत्ती ओढवू शकते याची कल्पनाही नव्हती” असा भीतीदायक अनुभव ३७ वर्षीय महिलेने सांगितला. हेलियमऐवजी हायड्रोजनच्या वापराबाबत माहिती द्यायला हवी होती असे म्हणत महिलेने फुगा विक्रेत्याला दोष दिला.

ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली असली तरी जखमी तिघांवर उपचार सुरुच होते. महिलेच्या मुलाचा चेहरा, कान आणि उजवा हात वरवर भाजले होते, तर तिच्या मित्र-मैत्रिणींना चेहऱ्यावर भाजल्याच्या जखमा होत्या. एकाला 12 दिवस हॉस्पिटलायझेशनची गरज पडली, तर दुसऱ्याला प्लास्टिक सर्जरी करावी लागली. माझा मुलगा या घटनेने इतका भेदरला आहे की थोडासा आवाज झाला तरी तो घाबरतो, असं महिलेने सांगितलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

11 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago