वडिलांचा अपघात झाला आहे असं सांगून अल्पवयीन मुलीला १९ वर्षीय तरुण घेऊन गेला. यानंतर त्याने रस्त्यात एका बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करणाऱ्या या आरोपी तरुणाला अकोल्याचे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने दोषी ठवरलं. अल्पवयीन पीडितेच्या लैंगिक शोषण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सैय्यद नदीम सैय्यद असद असं आरोपीचं नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी २६ ऑगस्ट २०२१ ला संध्याकाळी रस्त्यावरून जात असताना आरोपी सैय्यद नदीम सैय्यद असद याने तिला गाठले. तुझ्या वडिलांचा अपघात झाला आहे आणि घरचे सर्व लोक तिथे गेले आहेत. तु माझ्यासोबत चाल, अशी बतावणी करून अकोला शहरापासून १२ किमी अंतरावरील बार्शीटाकळी इथे बांधकाम सुरू असलेल्या एकांत ठिकाणी नेलं. तिथं कोणीही नाही, असं लक्षात आल्यानं पीडितेनं इथं का आणलं? असं विचारलं. तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. अपघात झाला नाही, मी खोटी माहिती दिली, असं आरोपीने तिला सांगितलं. पीडितेने त्याला नकार दिला. यानंतर आरोपीने तिला वायरने मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. रात्रभर तिथेच ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी अकोला रेल्वे स्थानकावर आणले. पीडितेच्या भावाने त्यांना तिथं पाहिलं. यावेळी आरोपी तिला घटनेबाबत वाच्चता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिथून पळून गेला. पीडितेच्या भावाने तिला घरी आणले आणि तिने घडलेला प्रसंग घरच्यांना सांगितला.
पीडितेच्या तक्रारीवरून सैय्यद नदीम सैय्यद असदवर कलम ३६३, ३६६, ३७६, ३२३, ५०६ व पोक्सो कायद्यांतर्गत कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर याचा खटला न्यायालयात सुरू झालाय. सरकार पक्षाकडून ९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. बचाव पक्षाकडून ३ साक्षीदारांच्या साक्षी पुरावे सादर करण्यात आले. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने अल्पवयीन पीडितेच्या लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवले. विविध कलमांमध्ये एकूण दंड १ लाखा १६ हजार रूपये, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा, कलम ३६३ – ७ वर्षे रू ५ हजार, ३६६ – १० वर्षे रू ५ हजार दंड, ३७६(३) – आजीवन कारावास ५० हजार रूपये दंड, ३२३ – १ वर्षे १ हजार रूपये दंड, ५०६ – ७ वर्षे रू ५ हजार दंड, पॉक्सो कायदा कलम ३-४ – आजीवन कारावास आणि ५० हजार दंड अशा सर्व शिक्षा आरोपीस एकत्र भोगावयाच्या आहेत. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली. तर प्रकरणाचा तपास पीएसआय संजिवनी पुंडगे यांनी केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…