आवताडे शुगरचा पहिला बॉयलर प्रदीपन संपन्न
आवताडे शुगर हा कारखाना शेतकऱ्यांच्या सहकार्यावर चालू हंगामात प्रतिदिन पाच हजार मे.टन ऊस गाळप करून हंगाम यशस्वी पध्दतीने पार पाडण्याचा निश्चय आम्ही केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आवताडे शुगर कारखान्यास घालून सहकार्य करावे, सर्व तोडणी ठेकेदार व कामगारांच्या सहकार्याने आम्ही हा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पार पाडणार असल्याचा विश्वास कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केला. आवताडे उदयोग समूहाने नुकताच खरेदी केलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टलरीज या कारखान्याचा “पहिला गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन” सोहळा ऊस उत्पादक शेतकरी आण्णाप्पा काकणगी व विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उभयतांचे शुभहस्ते सत्यनारायण महापूजा करून बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी शुगरचे माजी व्हा. चेअरमन अंबादास कुलकर्णी, पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, माजी उपसभापती सुरेश ढोणे, कात्राळचे सरपंच विजय माने, भैय्या कळसे, सद्गुरूचे संचालक मोहन बागल, शांतीनाथ बागल, महेश चव्हाण, शेखर भोसले, दादा ढोले, आबासाहेब पाटील, लक्ष्मण जगताप, युवराज शिंदे, प्रहारचे समाधान हेंबाडे, राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, बटू पवार, बसू पाटील, पप्पू काकेकर, सचिन शिवशरण, सौ.स्मिता म्हमाणे यांचेसह माजी शिवसेना तालुका प्रमुख प्रा.येताळा भगत, सरोज काझी, प्रमोदकुमार म्हमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आवताडे म्हणाले की माझं बोलणं कमी व काम जास्त असतं कारखान्याला ऊस घालणारे सर्व शेतकरी कामगार यांचं समाधान होईल असे काम आम्ही करणार आहोत या कारखान्याची पाच हजार मे.टन गाळपाची क्षमता आहे हा कारखाना आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली आवताडे उदयोग समूहाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आपल्या ताब्यात घेतला आहे या कारखान्यात उपपदार्थ निर्मितीची सोय असून ६५ के एल पी डी डीसलरीज निर्मिती होते. तर ३२ मेगावॅट को-जन निर्मितीही होते हा कारखाना सुरू झाल्याने सुमारे सातशे कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर २५० मोठ्या वाहनांचे करार झाले असून २०० डंपिंग ट्रॅक्टर व २०० बैलगाड्यांचेही करार केले असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
त्याच बरोबर आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सुमारे सहाशे एकर परिसर असल्याने कारखाना परिसरात तरुणांना आणखी रोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याचेही चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे म्हणाले की, हा कारखाना आम्ही साडेचार ते पाच हजार मे टन प्रतिदिन क्षमतेने चालविणार आहे. त्याच बरोबर हा कारखाना सुरू झाल्याबरोबर दीड महिन्यानंतर को-जन वीजनिर्मिती सुरू होणार आहे त्याच बरोबर डिस्टलरीही सुरू होणार असून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी सांगितले. यावेळी प्रा. येताळा भगत, भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, सोमनाथ आवताडे, जमदाडे सर यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कूर्मदास चटके, विनायक यादव, भारत निकम, बापू काकेकर, ऍड धनंजय जाधव, बिभीषण बेदरे, डॉ.ताणगावडे, गणेश गावकरे, विकास पुजारी, बापूसाहेब मेटकरी, तानाजी पाटील, रावसाहेब राजमाने, शिवाजी रणे, सचिन चौगुले, चनबसू येनपे, नंदू जाधव, सुहास पवार, सुभाष सरगर, बालाजी मेटकरी, प्रसाद सातपुते, समाधान घायाळ, अमोल माने, जकापा नरुटे, जगन्नाथ रेवे, धनंजय पवार, चंद्रकांत पडवळे, तानाजी डोके, विलास राठोड, भास्कर घायाळ, लक्ष्मण जाधव, आयुब शेख, दत्ता कोळेकर, गणेश पाटील, परमेश्वर येणपे, मोहन पवार, संभाजी फाळके, रघुनाथ उन्हाळे, रमेश पवार, संपत आठकळे, वसंत लेढ्वे, बबन रोंगे, दामोदर रेवे, मिन्हाज शेख, अजय सरवळे, श्रीकांत रोंगे, रणजीत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासो कदम यांनी तर आभार राजेंद्र पोतदार यांनी मानले.
दामाजी कारखान्यावर साखर शिल्लक नव्हती मग वाटप कसे सुरू?
दामाजी साखर कारखान्याचे सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन समाधान आवताडे यांनी दिवाळी साठी सभासदांना साखरही शिल्लक ठेवली नाही म्हणून आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला मग सध्या वाटप सुरू केलेली दामाजी कारखान्याचे शिक्के असलेली साखरेची पोती कोठून आली? दहा हजार क्विंटल शिल्लक ठेवलेली साखर गुपचूप 32 रुपये किलोने विकण्याचा सत्ताधारी संचालक मंडळाचा डाव होता तो डाव काही शेतकऱ्यांनी स्वतः गोडावूनची पाहणी करून हाणून पाडला साखर शिल्लक असतानाही वाटप नाही याची चर्चा तालुकभर सुरू झाल्याने चौकाचौकात सभासद हे संचालक मंडळ व चेअरमन यांना जाब विचारू लागल्याने नाइलाजास्तव यांना साखर बाहेर काढावी लागली त्यामुळे यांचे पितळ उघडे पडले केवळ थापा मारून सत्तेवर आलेल्या दामाजीच्या सत्ताधारी मंडळाचा कारभार 31 मार्चला आर्थिक निकषातून समजेल असा घनाघात दामाजी कारखान्याचे बिनविरोध संचालक अशोक केदार यांनी अवताडे शुगरच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्या त बोलताना केला .
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…