मागच्या तीन महिन्यापूर्वी सत्तापालट झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारकडून पोलीस दलात पहिल्यांदाच बदल्या मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा सुरू असताना. शिंदे सरकारकडून अचानक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याचबरोबर अनेक महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार असल्याने या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.
शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा रंगली होती. याबाबत गृह मंत्रालयाने काल (दि.20) गुरुवारी अचानक आदेश काढले आहेत. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर हे पोलीस दलातील मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 23 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आणि राज्य पोलीस सेवेतील दोन अशा 25 अधिकाऱ्यांच्या नवीन बदल्या करण्यात आल्या आहेत.
25 पोलीस उपआयुक्त, पोलीस अधीक्षकांच्या राज्यभरात वेगवेगळय़ा ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. दरम्यान ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा रंगली होती त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होता दुसऱ्या नावांची घोषणा झाल्याने हे बदल मोठे असल्याचे बोलले जात आहे. दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
काल याबाबत आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये मोहितकुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी.पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे, प्रविण पाटील आणि विजयकुमार मगर या भापोसे अधिकाऱ्यांची, तर राज्य पोलीस सेवेतील निकेश खाटमोडे यांचीही बदली करण्यात आली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…