मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाला लाज आणणारा प्रकार सिंगरौलीत घडला. मृत अर्भकाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. सिंगरौलीतील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही घटना घडली.
दिनेश भारती त्यांची गर्भवती पत्नी मीना यांना घेऊन १७ ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातील डॉ. सरिता शाह यांनी प्रसुती करण्याऐवजी मीना यांना खासगी क्लिनिकमध्ये पाठवलं. वर त्यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले. अर्भकाचा गर्भाशयातच मृत्यू झाल्याचं क्लिनिकमधील डॉक्टरांना समजलं. त्यानंतर त्यांनी महिलेला पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठवलं. तिथे तिची प्रसुती करण्यात आली, तेव्हा बाळ मृतावस्थेत होतं.
मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका मागितली. बाळाला गावी नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र रुग्णालयानं रुग्णवाहिका दिली नाही असा आरोप दिनेश भारती यांनी केला. यानंतर दिनेश यांनी बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. दिशेन यांनी त्यांची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम यांना चौकशीचे आदेश दिले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…