नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका कॉलेजच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. किरकोळ कारणावरून ही हाणामारी सुरू झाली होती. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसन नंतर थेट जबर हाणामारीत झालं. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. जखमी झालेल्या तरुणावर सध्या नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी घडली आहे. मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही हाणामारी झाली तेव्हा त्या ठिकाणी महाविद्यालयाचे बाऊन्सर देखील उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या बाऊन्सरसमोरच ही घटना घडली. त्यानंतर बाऊन्सरने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालाही न जुमानता विद्यार्थ्यांची मारामारी सुरूच असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असून नाशिकच्या त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजच्या आवारात वारंवार होणाऱ्या हाणामारीच्या घटनांनी बाहेरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…