ताज्याघडामोडी

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध

पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ ते शुक्रवार, दि.२१ ऑक्टोबर २०२२ च्या सायं. ४ वाजेपर्यंत चालणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. ऑनलाईन (कॅप) रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोंबर २०२२ पासून सुरु झालेली असून शुक्रवार, दि.२१ ऑक्टोंबर २०२२ च्या सायं. ४ वाजेपर्यंत चालणार आहे. रजिस्ट्रेशन साठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-८०० रु.आणि इतर प्रवर्ग-६०० रु. असे आहे.

रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. या वर्षी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा.नं.-९५९५९२११५४) व प्रा.पोपट आसबे (मोबा.नं.- ७८२१००४६४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशासंदर्भातील प्रक्रियेत होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे.’ असे आवाहन करण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago