पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ पासून सुरु झाली या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ ते शुक्रवार, दि.२१ ऑक्टोबर २०२२ च्या सायं. ४ वाजेपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध असुन या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करणेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-८०० रु.आणि इतर प्रवर्ग-६०० रु. असे आहे.
रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम असे गरजेच आहे. या वर्षी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी महाविद्यालयात प्रा. सोमनाथ कोळी ८३७८०१७५४६, प्रा. उमेश घोलप८०५५१०३७१५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…