परीक्षेत कॉपी केल्याच्या संशयातून शिक्षकेने कपडे उतरवल्याने विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना झारखंडमधील जमशेदपूरमध्ये घडली आहे. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर भाजली आहे. तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला टीएमएचमध्ये रेफर करण्यात आले आहे.
जमशेदपूरमधील छायानगरमध्ये राहणारी पीडित मुलगी साकची येथील शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. सध्या शाळेत परीक्षा सुरु आहे. परिक्षेवेळी पीडित मुलगी कॉपी करत असल्याचा शिक्षिकेला संशय आला.
संशयातून शिक्षिकेने मुलीला वर्गात सर्वांसमोर कपडे उतरवायला सांगितले आणि मारहाण केली. यामुळे मानसिक तणावात आलेल्या मुलीने घरी जाऊन स्वतःला पेटवून घेतले, अशी माहिती मुलीने पोलीस जबाबात दिली आहे. आपण कोणतीही कॉपी केली नसल्याचे मुलीने सांगितले.
घटनेत मुलगी 80 टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आहे. संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेचा तपास सितारामडेरा पोलीस करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…