चांदवड कातरवाडी येथे मागच्या तीन दिवसांपूर्वी सोपान बाबुराव झाल्टे यांचा राहत्या घरी अज्ञात लोकांनी लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सोपान यांच्या बायकोने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु असताना तपासात धक्कादायक बाब उघड झाली आहे. या हत्येत तक्रारदार पत्नीचाच हात असल्याचं स्पष्ट झाले असून या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नीसह तिच्या दोघं साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात हा तपास करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी बाबुराव महादू झाल्टे हे आजारी असल्याने घरातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. त्यांच्या देखभालीसाठी त्यांचा मुलगा सोपान बाबुराव झाल्टे हेही त्यांच्यासमवेत पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणावरुन पती व सासरे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात सोपान बाबुराव झाल्टे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील बाबुराव महादू झाल्टे हे जखमी झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंग साळवे आणि चांदवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले तपास सुरु केला होता. चांदवड पोलीस स्टेशनला सोपान बाबुराव झाल्टे यांची हत्या झाल्यानंतर संशयित आरोपी पत्नीनेच तक्रार दाखल केली होती. मनीषा सोपान झाल्टे असं संशयित पत्नीचे नाव असून तिच्या तक्रारीवरुनच प्रकरणाचा तपास सुरू होता. तर तपासाअंती हत्येची तक्रार दाखल करणाऱ्या पत्नीलाच हत्येच्या आरोपात ताब्यात घेतलं आहे.
तपासाची सर्व बाजू त्यांच्या पत्नीकडे जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी उलटा तपास करण्यास सुरवात केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत. तर मयत सोपान झाल्टे यांच्या हत्येच्या आरोपात पत्नी मनीषा सोपान झाल्टेसह तिचे सहकारी सुभाष संसारे (रा. कातरवाडी) खलील शहा (रा. मनमाड) अशा तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपी हे चांदवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…