महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई, कौशल्य रोजगार व उद्योजकता सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त उपक्रमातून दुसर्या टप्प्यातील “बूट कॅम्प आणि पिंचीग” कार्यक्रमात कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या सुजीत बारले व आदिनाथ साळुंखे या दोन विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाराष्ट्र स्टार्टअप याञेच्या दुसर्या टप्प्यात सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या “मार्गदर्शन कार्यक्रम आणि व्यवसाय सादरीकरण” मध्ये पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
या स्पर्धेत सोलापूर विद्यापीठात ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रोजेक्ट व इनोव्हेटिव्ह आयडिया सादर केली होती. यामधुन सुजित बारले व आदिनाथ साळुंखे या दोन विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी विविध क्षेत्रातील उद्योजकांचे शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योजक होणेसाठी मार्गदर्शन केले जाते. याचअनुशंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट व इनोव्हेटिव्ह आयडिया या स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणेसाठी उद्योजकता कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जाते.
तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डाॅ. कैलाश कराडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी, मार्गदर्शन शिक्षक प्रा. अतुल आराध्ये सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…