ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ४४ विद्यार्थ्यांची “इन्फोसिस” कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

पंढरपूर सिंहगड ठरले सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय

पंढरपूर: प्रतिनिधी

इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड हि एन. आर. नारायण मुर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात १९८१ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा देण्यासाठी इन्फोसिस कंपनी स्थापन केली. १९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे नेले. भारतात इन्फोसिसचे नऊ साॅफ्टवेअर विकासकेंद्रे असुन जगभरात ३० ठिकाणी कार्यालय आहेत. या कंपनीत ८८, ६०१ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयातील ४४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील निकिता सुर्यवंशी, ऋतुजा देशमुख, साहिल शेख, संकेत तोडकर, आरती पिंगळे, काजल जाधव, स्नेहल वसेकर, सुप्रिया कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील समाधान माळी, रोहन देशमुख, मोईन तांबोळी, पुनम माने, शशिकांत गिरी, अजिंक्य कोळवले, रोहित नाईकनवरे, सद्दाम पठाण, शुभम जोशी, रोहित सुरवसे, आकाश लिंबुरकर, तात्या आठवले, निलकंठ सोनटक्के, ऋषिकेश कांबळे, वैभव जोगी, दिपक शिंदे, संकेत पारखे, दत्तात्रय कविटके, प्रसाद राऊत, गुलमोहम्मद पिरजादे, अक्षय लवटे, आशुतोष सावंत, अविनाश व्यवहारे, चैतन्य पेटकर, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील श्रीकृष्ण चव्हाण, राकेश देशमुख, ऋतुजा भिवरे, निकिता जगताप, वर्षा ठोकळे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील अयेशा शेख, मेघा कुटे, ॠतुपर्णा लावंड, प्रणोती श्रीखंडे, रूक्मिणी खिलारे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील अंकिता पांडे, विशाल देवकर, कोमल पवार, पुष्पांजली पांढरे आदी ४४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून ३.६० लाख वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

  अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने सातत्यपूर्ण निकाल, प्लेसमेंट मधील दमदार वाटचाल, शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय उद्योजक क्षेत्रात हि महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी

विविध क्षेत्रात करिअर करीत आहेत. सिंहगड संस्थेने आपला शैक्षणिक क्षेत्रातील ठसा जगभर उमटवला आहे. सिंहगड संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत सहजरीत्या प्लेसमेंटची संधी प्राप्त होते. सिंहगड संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे हि संस्था राजकारण विरहित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत असलेले कौशल्य बाहेर येण्यासाठी महाविद्यालय प्रोजेक्ट बेस लर्निंग काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित शिक्षण देत आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगिंण विकास कसा होईल याकडे महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग जातीने लक्ष देत असतात. दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाठी निसर्ग-रम्य असे वातावरण असुन विद्यार्थ्यांना अभ्यासाठी स्वतंञ हॉल उपलब्ध आहेत. याचबरोबर सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम महाविद्यालयात प्रत्येक वर्षी राबवले जात असल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थीना आपले कला-कौशल्य सादर करण्यासाठी वाव मिळतो. टीचर- गार्डियन पद्धती नुसार प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन केले जाते. आय. टी. कंपनीत पंढरपूर सिंहगडचा विद्यार्थी हा सिंहगड या ब्रँड वरच मोठ्या प्रमाणात निवडले जात आहे.

“इन्फोसिस” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago