ताज्याघडामोडी

‘खर्च करूनही मुलांना नोकरी मिळणार नाही’, चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख करत शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

शेतकरी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ, अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. अनेकजण या संकटातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर बरेच शेतकरी सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलतात. हे वास्तव अतिशय धक्कादायक आहे. आता बीडमधून नुकतीच एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

बीडमधील या घटनेत मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करत एका शेतकऱ्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहिली आहे. ज्यामध्ये आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे, की ‘मी माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही. खर्च करूनही मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नाही. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे’. अशी चिठ्ठी लिहून बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

दादा डिसले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही आणि त्यावर बेरोजगारी अशा कारणांनी बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावचे शेतकरी दादा डिसले यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट समोर आली आहे. त्यात दादा डिसले यांनी मराठा आरक्षण नसल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

18 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago