जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नवीपेठ येथील महावीर बँकेच्या पाठीमागे एका कंपनीच्या नावे असणाऱ्या ऑफिसमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सेक्स रॅकेटवर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज दुपारी ४ वाजता छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कारवाई करत २ पुरुष ग्राहक आणि ६ तरुणींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे.
शहरातील नवीपेठ परिसरातील महावीर बँकेच्या पाठीमागे असलेल्या एका कार्यालयाच्या खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची गोपनीय माहिती आज शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह पथकाने छापा टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात अवैध सेक्स रॅकेट्स अनेक ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असून पोलीस अधिकारी व कर्मचारी हे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी मोठी कारवाई करत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत वेश्यव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणींना ताब्यात घेतलं आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…
पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…
कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…