महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीची त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली होती. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्यानंतर ठाकरे गटाने दिलेल्या दुसऱ्या पसंतीवरील मशालला चिन्हाला निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून पेटती मशाल देण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. तर शिंदे गटाला नव्याने तीन चिन्ह देण्यास निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…