महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, त्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे.
तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह अन् नाव गोठवल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर दोन्ही गटाने तीन पर्यायी चिन्ह अन् नाव निवडणूक आयोगाकडे सोपवलं होतं. यानंतर आजा निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य, गदा आणि त्रिशूळ ही तीन पक्ष चिन्ह मागण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…