एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणाने हातात विषाची बाटली घेत तो टॉवरवर चढला. एवढेच नव्हे, तर येथील अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस अधिकारी police officer असलेल्या दाम्पत्यावर धमकी दिल्याचा आरोप करत त्याने विष प्राशनाचा प्रयत्न केला आहे. ही गंभीर घटना आज रविवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पांढरकवडा येथील सुराणा जिनिंग परिसरातील वीज वितरण कार्यालयाच्या आवारात घडली.
पांडुरंग श्रीकृष्ण मुतनेनवार (32) रा. सिंधी कॉलनी पांढरकवडा असे टॉवरवर चढून विष प्राशनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी नागरिकांनी त्याला चोप दिला होता. तसेच पीडित तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्घ विनयभंगाचा गुन्हा येथील अवधूतवाडी पोलिसात दाखल झाला होता. तपासादरम्यान त्याला अटकही करण्यात आली होती.
दरम्यान, तपासअधिकारी महिला आणि तिच्या पतीने खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिल्याने हा प्रकार केल्याचे त्याने यावेळी बोलताना सांगितले आहे. पांडुरंग टॉवरवर चढल्याचे समजताच पांढरकवडा पोलिसांचे पथक दाखल झाले होते. दरम्यान त्याची प्रशासनाकडून मनधरणी सुरू होती. मात्र, त्याला टॉवरवरून उतरविण्यात यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…