ताज्याघडामोडी

मॅनेजरनेच बँकेच्या तिजोरीतून पळवली ३४ कोटींची रोकड; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

बँक दरोड्याच्या युट्युबवरून वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारून ३४ कोटींची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे चोरीचे बिंग फुटण्यापूर्वी १२ कोटीची रोकड बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजरने 3 मित्रांच्या मदतीने पळवली होती. याच गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी अडीच महिन्याच्या तपासानंतर मुख्य आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे केवळ कुटूंबातील सदस्यांना ऐशो अरामाचे जीवन जगता यावे, यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग निवडल्याची बाबसमोर आली आहे. अल्ताफ शेख (वय ४३ ) असे अटक केलेल्या कॅश कस्टोडियन मॅनेजरचे नाव आहे.

मुख्य आरोपी अल्ताफने आयसीआयसीआय बँकेत रुजू होण्यापूर्वी 3 खासगी कंपन्यांमध्ये लिपिक म्हणून काम केले. त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला 3 वर्षांत कस्टोडियन मॅनेजर म्हणून बढती मिळाली. ११ वर्षात त्यांची कधीही शाखेतून बदली झाली नाही. तो त्याची आई, पत्नी आणि मुलीसह मुंब्रा येथे राहत होता. त्याच्या सहकाऱ्यांनी दावा केला की, तो विश्वासार्ह आहे. आणि पूर्वी रोख रकमेची कोणतीही समस्या नव्हती. दोन- तीन वर्षांपूर्वी शेखच्या मोठ्या आणि धाकट्या बहिणीचा घटस्फोट झाला आणि दोघेही त्यांच्या कुटुंबासह त्याच्याकडे राहायला आले, तर त्याचे वडीलही त्यांना सामील झाले. आरोपी शेख आणि त्यांची पत्नी हे एकमेव कमावते होते. मात्र १० ते १२ लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होते. हताश होऊन पैशाच्या त्रासावर मात करण्यासाठी त्याने चोरीची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीतील एमआयडीसी भागात आयसीआयसीआय बॅक आहे. या बँकेत मुख्य आरोपी अल्ताफ हा ११ वर्ष कॅश कस्टोडियन मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीत असलेल्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा वर्षभरापूर्वी कट रचला होता. या करीत तो बँकेत दरोड्याच्या वेब सिरीज पाहत होता. काही बेव सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची कल्पना आली. त्यातच तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेच्या विषयी सर्वच माहिती होती. त्याने एके दिवशी बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम करताना पहिले आणि त्या दिवसापासून तो एसीच्या डक्टमधून कसे बँकेच्या तिजोरीत जाता येईल याची योजना आखली, आणि सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला आणि चोरीची योजना आखण्यासाठी चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केली. त्यानंतर ८ ते १३ जुलैपर्यत तिजोरीतून ३४ कोटी रुपये त्याने एसीच्या डक्टमधून बनवलेल्या छोट्या छिद्रातून ही रोकड बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या कचरा पेटीनजीक ताडपत्रीने झाकून ठेवली होती.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, डक्ट 10 इंच रुंद होता, त्याने मेटल शीट गॅस कटरच्या सहाय्याने कापून पाच ते सहा इंच रुंद केले. तिजोरी रिकामी असताना त्याचे व्हिडिओ काढले. अलार्म सिस्टम सदोष असताना काही सीसीटीव्ही निकामी झाले आहेत आणि ते निष्क्रिय केले जाऊ शकतात हे त्याला माहीत होते. बँकेच्या समोर सुरक्षा रक्षकच होते तर मागच्या बाजूला कोणीही नव्हते. त्याने त्याच्या वरिष्ठांचे लॉगिन तपशील देखील मिळवले, शनिवारी, इतर कर्मचारी निघून गेल्यावर, त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये लॉग इन करून त्यांना थांबवले आणि स्क्रीनवर तिजोरी रूमचे फुटेज चिकटवले आणि काही काळ ते टेम्परिंग ठेवले जेणेकरून तिजोरीची मॉनिटर पाहणाऱ्या सुरक्षा रक्षकाला तिजोरी रूममध्ये कोणी नसल्याचे दिसून येईल असा कट रचून त्याने चोरी केल्याचे तपासात समोर आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago