ताज्याघडामोडी

पुढचे 2-3 दिवस ‘मुसळधार’, देशभरातील 17 राज्यांना जोरदार पावसाचा इशारा

अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला.

सुमारे 12 तास झालेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भाग ठप्प झाले होते. या पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शिवाय, महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हवमान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच, मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

याशिवाय रविवारी पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सध्या पावसाची संततधार कायम आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील 3 ते 4 दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. आग्रा, ग्वाल्हेर या भागातून मान्सून माघारी परतला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago