प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी रिक्षाचालकाला धमकावून त्याच्यावर ब्लेडने वार करुन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिघांपैकी कुमार राम कांबळे (वय २१, रा.आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याला अटक केली आहे.
याबाबत रिक्षाचालक अजयकुमार मुन्नालाल सरोज (वय २५, रा. कात्रज) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १५८/२२) दिली आहे. ही घटना मार्केटयार्डमधील बैलबाजारात गुरुवारी रात्री दहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. तिघा जणांनी बैलबाजार येथे हात दाखवून रिक्षा थांबविली. प्रवासी असल्याचे समजून सरोज यांनी रिक्षा थांबविली. तिघे रिक्षात बसल्यावर त्यातील एकाने फिर्यादी यांना तुझ्याकडे असलेले सर्व पैसे काढून दे, नाही तर जीवाने जाशील अशी धमकी दिली. तेव्हा सरोज याने त्यांना पैसे नाहीत, असे म्हटले. रिक्षात बसलेल्या इतर दोघांनी फिर्यादी यांना पकडून ठेवले. त्यांच्यातील एकाने त्याच्याकडील ब्लेडने फिर्यादीच्या छातीवर, पोटावर, हातावर मारुन जखमी केले.
एकाने चावा घेतला. खिशातील ३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर रिक्षा घेऊन ते पळून गेले.ही रिक्षा आंबेडकर नगर रिक्षा स्टँड येथे नंतर मिळून आली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…