सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपले फॉलोअर्स वाढवण्याच्या वादावरून एका अल्पवयीन मुलीने एका तरुणाची हत्या केली आहे. या घटनेत तरुणीसह तिचा भाऊ आणि दोन मित्रही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी तिच्यासह तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. त्यातील एक साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. मृत तरुणाचं नाव साहिल असं असून त्याची या 17 वर्षीय मुलीशी मैत्री होती. याच मुलीने त्याच्या हत्येचं कारस्थान रचलं. बुधवारी रात्री मुलीने आपल्या दोन मित्रांच्या आणि भावाच्या मदतीने साहिलची हत्या केली. साहिलला मृत्युपूर्वी मारहाण करण्यात आली. त्याच्या गळ्यावर चाकूच्या खुणा आढळल्या आहेत. त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बुधवारी मुलीने साहिलला स्वतःच्या घराजवळ बोलवलं. साहिल आल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या गळ्यावर चाकू चालवला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे एक मुख्य कारण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्स वाढवण्यावरून झालेला वाद हे असू शकतं. कारण, या हत्येमागचा अन्य हेतू अद्याप उलगडू शकलेला नाही.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…