कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील नगर मनमाड महामार्गालगत तीनचारी जवळील रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी वय १६ हीचा आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. उपस्थितांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. घटना घडल्यापासून मयत मुलीची मोठी बहीण ही आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. त्यामुळे संशयाची सुई तिच्याकडे जात होती. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी कोपरगाव शहर पोलिसांनी मयत मुलीची मोठी बहीण व तिचा प्रियकर हिला श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले होते. या घटनेत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याचा सखोल तपास करून मयत मुलीची आई संगीता नवनाथ बानकर वय 40 यांच्या फिर्यादीवरून मयत मुलीची मोठी बहीण सृष्टी नवनाथ बानकर 19 हिच्यावर भादवी कलम 303 प्रमाणे खुनाचा गुन्हा बुधवारी उशिरा दाखल केला आहे. प्रियकरासाठी मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने कोपरगाव तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी तरुणी हिचे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील आकाश राजेंद्र कांगुने याच्यासोबत प्रेम संबंध होते व तिला आकाश याने दिलेला मोबाईल मयत मुलगी हर्षदा हिने यापूर्वी पकडून तिचे मम्मी पप्पांना दिल्याने व तिचे प्रेम प्रकरण उघड झाल्याने व तिचे कॉलेज जाणे बंद झाल्याने त्याचा राग तिच्या मनात होता. तसेच आरोपी मुलीगी प्रेम संबंध असलेला मुलगा आकाश राजेंद्र कांगुणे याच्यासोबत घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना यातील मयत मुलगी हर्षदा हिने तिला विरोध केल्याने आरोपी तरुणी सृष्टीने मयत हर्षदा हिचा कापडी ओढणीने गळा आवळून तिला जिवे ठार मारले. दरम्यान सदर गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत का ? याबाबत चा तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे करीत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…